पुणे : राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आणि संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेने महाविकास आघाडी बाजूने कौल दिल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीला राज्यात ४८ जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळाला असून महायुतीला महाराष्ट्रात अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भोपळा फुटला असून राज्यात एकाच जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. मात्र, भाजप श्रेष्ठींकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएच्या सरकारमध्ये मंत्रिपद घेतले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच विधानसभेसाठी अजित पवार गटाने ८० जागांची मागणी केली आहे. शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेचू घोषण केली पाहिजे, असे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत.
“विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गट ८० जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल. निकष आहेत ते ठरले आहेत. त्यानुसार छगन भुजबळांनी ९० जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली होती. तरी किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत”, अशी आमची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘वादा तोच दादा नवा’! बारामतीत नव्या दादाची एन्ट्री; सर्वत्र झळकले पोस्टर्स
-एकाच पावसात उडाली पुणेकरांची दाणादाण, शहरात पावसाने नेमकी काय परिस्थिती?
-बूथवरचा कार्यकर्ता ते केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांची मोदी सरकारमध्ये वर्णी; आजच शपथविधी
-पुण्याचे खासदार होताच मुरलीधर मोहोळांनी दिला पुणेकरांना ‘हा’ शब्द
-‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली