पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या अन् सर्व राजकीय पक्षांकडून जागावाटपाचं प्रश्न मिटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उमेवारीवरुन इच्छुकामध्ये रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारी न मिळण्याचे संकेत दिसताच अनेक नेते बंडखोरी, पक्षांतर करताना दिसत आहेत. यावर तोडगा म्हणून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही इच्छुकांच्या राज्य सरकारने महामंडळावर नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील अशाच प्रकारे काही मतदारसंघातील इच्छुकांना महामंडळ दिली आहेत. ‘हे महामंडळ मला नको मला मावळमधून विधानसभेची उमेदवारी द्या’, अशी मागणी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू साहेब भेगडे यांनी केली आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ते 25 वर्ष मी तळेगाव नगरीचा नगरसेवक म्हणून कार्यरत आहे ती संधी मला राष्ट्रवादी काँग्रेसने दिली. जिल्हा नियोजन समिती, सहकारी साखर कारखाना पदांवरती काम करताना जनतेची सेवा केली. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसने मला या भागातून विधानसभेची उमेदवारी दिली मात्र त्यावेळी मला अपयश आलं. परंतु अपयशयाने खचून न जाता मी सातत्याने काम करत राहिलो आहे. 2014 मध्ये उमेदवार बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि तो आम्ही मान्य केला मात्र त्यावेळी देखील पराभवच हाती आला. 2019 ला माझी उमेदवारी जवळपास निश्चित असताना बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तरी देखील आम्ही पक्षासाठी काम केलं’, असे बापू भेगडे म्हणाले आहेत.
दरम्यान, मावळ मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असताना भाजपने देखील दावा केला आहे. त्यातच मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. शेळकेंची उमेदवारी जवळपास निश्चित असताना बापू भेगडे यांनी विरोध करत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. एकीकडे भाजपचा दावा अन् दुसरीकडे स्वकियांकडून होणारा विरोध यामुळे शेळकेंची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार आता बापू भेगडेंच्या पत्रकार परिषदेनंतर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील ‘या’ चार मतदारसंघाचा पेच काही सुटेना! महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी
-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त
-कसब्यात इच्छुकांकडून ब्राह्मण कार्डची खेळी, भाजप बहुजन उमेदवार डावलणार का? राज्यात वातावरण तापणार
-खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?
-चाकणकरांना पुन्हा मिळालं महिला आयोगाचं अध्यक्षपद; दादांच्या राष्ट्रवादीत वादाच ठिणगी