पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जवाहरलाल नेहरु स्टेडियमची आंतरराष्ट्रीय नियमानुसार विकसित करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव भारतीय खेळ प्राधिकरणाला पाठवणार आहोत. बाबूराव सणस मैदान येथे स्वतंत्र क्रीडा माहिती कक्ष उभारणार असून, नागरिकांना क्रीडाविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व भागांमध्ये मोकळ्या मैदानांचा खेळांसाठी अधिकाधिक कसा उपयोग करता येईल यासाठी धोरण निश्चित करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा पाठपुरावा करणार आहे.
शहरातील सर्वच खेळाडूंना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. रासने यांच्या प्रचारार्थ संत कबीर चौक, नेहरु रस्ता, निवडुंग विठोबा, डुल्या मारुती, दगडी मारुती, सोन्या मारुती चौक, मोती चौक, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजश्री सूर्या यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारफेरीचा प्रारंभ झाला.
रासने म्हणाले, ‘महापालिका हद्दीतील क्रीडांगणासाठी आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल-क्रीडांगणे विकसित करणे, क्रीडा स्पर्धा भरविणे, क्रीडा नर्सरी तयार करणे, स्वतंत्र क्रीडा माहितीविषयक कक्ष, उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आदी योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.’
“विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी विविध योजना आखणार आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात क्रीडा क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित करण्यावर भर देणार आहे. पुणे महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनींची संख्या वाढविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खेळाडूंना अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करून देणार आहे. त्यांची कसून तयारी करून घेऊन त्यांना स्पर्धेमध्ये उतरविले जाणार आहे”, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
राजेंद्र काकडे, शिवम आंदेकर, जयश्री आंदेकर, दत्ता सागरे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, अरविंद कोठारी, तेजेंद्र कोंढरे, निर्मल हरिहर, करण देसाई, संकेत थोपटे, पुष्कर तुळजापूरकर, पाठक, कौशिक कोठारी, निलेश खडके, तुषार रायकर, समर्थ भोसले, कुणाल गरुड, सनी पवार, गौरी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन
-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?
-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?
-वडगाव शेरीत महायुतीला मोठा धक्का; माजी नगरसेविका टिंगरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
-“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील