Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. या प्रकरणावरुन अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्यात कटुता आल्याचे बोलले जात आहे. त्यात नताशाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आडनाव हटवले. तसेच अनेक फोटोही डिलीट केले आहेत.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचे २०२० मध्ये लग्न झाले. या दोघांनाही लग्नापूर्वीच अगस्त्य नावाचा मुलगा आहे. पण नताशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘पंड्या’ हे आडनाव काढून टाकले होते. यावरुन सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली.
नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नताशा आणि हार्दिकचे काही फोटो डिलीट केले आहेत. अलिकडे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसत नाहीत. त्यामुळे नताशा आणि ह्रार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. याच कारणामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. त्यातच आता नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्या अत्यंत जवळच्या मित्राने मीडिया मुलाखतीमध्ये त्यांच्याबाबत माहिती दिली आहे.
“हार्दिक पंड्या आणि नताशा अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात ते खरोखरच समस्यांचा सामना करत आहेत. नताशा हार्दिकसोबत राहत नाही. ते एकत्र पुन्हा राहू लागतील की नाही माहिती नाही. कदाचित येतीलही. दोघेही आधुनिक विचारांचे आहेत”, असे हार्दिक आणि नताशाच्या मित्राने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा
-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे
-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?