पुणे : पुणे शहरात देशातील सर्वात मोठे ड्रग्जचे रॅकेटचा खुलासा झाला आहे. पुणे पोलिसांनी पुण्यासह सांगली, दिल्लीत ड्रग्जचे साठे जप्त केले आहेत. पुणे पोलिसांनी आता पर्यंत या प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार किलोंचा साठा पुणे दिल्ली आणि सांगलीतून जप्त केला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या कामगिरीचे नाशिकच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कौतुक केले आणि नाशिक पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यामध्ये पुन्हा कोट्यवधींचा एमडी (मेफेड्रॉन) साठा जप्त करण्यात आले आहे. या कारवाईसंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचे सोशल मीडियावरून कौतूक केले आहे. तसेच नाशिक पोलिसांना सतर्कतेचा इशाराही दिला. शहरात छुप्यापद्धतीने अमली पदार्थांची विक्री सुरू असल्यास तत्काळ कारवाईचे आदेश देतानाच, संशयास्पद ठिकाणांवर ‘वॉच’ ठेवून कारवाई करण्याचेही आदेश बजावले आहेत.
पोलिसांकडून अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये नव्याने परवाने दिलेल्या केमिकल कंपन्या व शिंदे गावप्रमाणेच शहरालगत सुरू असलेल्या खासगी औद्येागिक वसाहतीतील गोदामांची माहिती संकलित करण्यात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, शहरातील तसेच परिसरातील ढाब्यांची तपासणी करताना अमली पदार्थ विक्रीची संशयास्पद ठिकाणांची माहिती संकलित करून कारवाई करण्याचे आदेश दिलेआहेत. नाशिकमध्ये ड्रग्जचे ४ गुन्हे गतवर्षी दाखल झाले होते. त्यामध्ये ललित पाटील टोळीतील संशयित पुणे आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.
नाशिक पोलिसांनी सनी पगारे टोळीला जेरबंद करीत एमडीचे मोठे रॅकेट उदध्वस्त केले. वडाळा गावातील छोट्या भाभीचे एमडी रॅकेटही उदध्वस्त केले. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी मुंबईहून एमडी आणून नाशिकमध्ये विक्री करताना ड्रग्ज पेडलर्सला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका
-पैसे परत केले नाही म्हणून शिवीगाळ, मानसिक त्रास; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
-तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार
-पुणे ड्रग्ज रॅकेट: दिल्लीत अटक केलेल्या ३ आरोपींना रात्री पुण्याला आणलं