पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे उरुळी कांचन येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार देखील उपस्थित होते.
“पंतप्रधान मोदी कधी नेहरूंवर टीका करतात. खरे तर आज नेहरू हयात नाहीत. पण, आता आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर, कधी उद्धव ठाकरेंवर तर कधी राहुल गांधींवर पंतप्रधान टीका करतात. आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही“, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.
“राज्यात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. १० वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची कामाची पध्दत पाहून लोक अस्वस्थ झाले आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे. गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. जनतेच्या मनात काय आहे, हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही.” असं म्हणत शरद पवारांनी राज्यातील जनतेची, शेतकऱ्याची व्यथा सांगितली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित
-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी
-Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..
-“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…