पुणे : देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा सरकार येणार असल्याचं लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी 9 जून 2024 संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे.
एनडीएच्या खासदारांव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडणार असल्याचे बोलले जाते. मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे.