पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन करत पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप सोबत जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावरुन आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं, कितीही आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरीही महाराष्ट्रातील जनता ते काही ऐकणार नाही. भाजप सोबत जे जे लोक गेले आहेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. भाजपला निवडून पाठवलं ही महाराष्ट्राच्या जनतेकडून चूक झाली असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
भाजपचे यापुर्वी कधीही इतके आमदार निवडून आले नाहीत. याच्याच जोरावर भाजपने राज्यात कसा खेळ खेळला. महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकर विचाराला काळिमा लावण्याचं पाप भाजपने केलं हे महाराष्ट्राची जनता ओळखत आहे. भाजपचे आमदार सरळ म्हणत आहेत मराठा समाजावर फडणवीसांचे उपकार आहेत. पण उपकार कोणाचे कोणावर आहेत हे निवडणुकीत समजवतील, अशा शब्दात नाना पटोलेंनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
अजित पवार यांचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं तरी जनतेला हे पचनी पडणार नाही. त्यांना याची फळं भोगावी लागणारच आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते, अशी स्टोरी सांगताहेत. मात्र, जनता आशा भूलथापांना बळी पडणार नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-
- भाजप आमदार म्हणतात की मराठा समाजावर उपकार आहेत. आता भाजपचे मराठा समाजावर किती उपकार आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. जनता धडा शिकवेल.
- मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते अशी स्टोरी सांगत आहेत.
- मनोज जरांगे यांनी आम्हाला आधी शिव्या घातल्याच की मग फडणवीसांना शिव्या घातल्यावर लगेच कसे पडसाद उमटू लागले. आम्ही काय माणसं नाही का? आम्ही शिव्या दिल्या याचं समर्थन करत नाही. पण चित्र कसं आणि का बदलले हे सर्वांसमोर आहे.
- फडणवीस हे गृहमंत्री आहेत, आज ड्रग्स माफियाचे जाळे पसरले आहेत. ड्रग्स माफिया काय जावई आहेत का? गुटखा विक्री होते, विक्री करणारे जावई आहेत का? मग अशावेळी जरांगे यांनी हत्येच्या कटाचा आरोप केला, याची चौकशी व्हायला हवीच.
- बाजार समित्या उद्वस्थ करायचं धोरण भाजपने स्वीकारलं आहे. त्यामुळं या कायद्या विरोधात बाजार समित्या बंद आहेत.
- मविआ बैठक उद्या होईल, प्रकाश आंबेडरकरांना उद्या जमत नसेल तर २८ फेब्रुवारी ला भेटू.
- या लोकसभेला अधिक महिलांना उमेदवारी दिली जाईल, ते दिसेल.
- नाना पटोले यांची एक चूक आहे, माझ्या नेतृत्वात अधिक जागा मिळत आहेत, मी प्रत्येक निवडणूक जिंकतोय. पण ती चूक असेल तर ती चूक मी करत राहीन आणि काँग्रेसला सत्तेत आणायचा प्रयत्न करत राहीन. ही चूक मी नेहमी करायला तयार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…
-“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”
-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”
-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित
-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे