पुणे : विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. राज्यभरातून अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असा निर्धार केलेल्या नाना काटेंच्या बंडाला शांत करण्यात वरिष्ठांना यश आलं आहे. नाना काटेंनी आपली तलवार म्यान केल्यामुळे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांनी दिलासा मिळाला आहे. नाना काटेंची नाराजी दूर करण्यासाठी करत बंडखोरी टाळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी फोनाफोनी केली असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना उमेदवारी मिळाली नव्हती. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं होतं. काटेंच्या बंडखोरीचा महायुतीसह महाविकास आघाडीला फटका बसला असता त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांकडूनही नाना काटेंना संपर्क साधला गेला होता.
दरम्यान, चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपचे शंकर जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी
-शरद पवारांचा फोन तरीही तोडगा नाहीच, आबा बागुल पर्वतीतून लढणारचं; नेमकं काय घडलं?
-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?
-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली
-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी