पुणे : शनिवारी, २ मार्च रोजी बारामतीमध्ये राज्य शासनाच्या वतीने ‘नमो रोजगार मेळाव्या’चं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या अधिकृत कार्यक्रमात या मेळ्याव्याच्या उपस्थितीबाबत उल्लेख आहे. ‘नमो रोजगार मेळाव्या’ला उपस्थित राहण्यास आपल्याला आवडेल अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलं असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी जेवणाचं निमंत्रण शरद पवारांनी दिलं आहे.
या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण या राष्ट्रवादीच्या खासदारांची नावं आहेत, पण शरद पवारांचं मात्र नाव नाही. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून त्यांचे नाव या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
बारामतीच्या कार्यक्रमाचा उल्लेख हा शरद पवारांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात असल्याचा उल्लेख आहे. शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या दृष्टीने शरद पवार हे शुक्रवारी रात्रीच बारामतीमध्ये येणार आहेत.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि याच १२ एकराच्या मैदानावर बारामती नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. तरी देखील शरद पवारांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”