पुणे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा सामना रंगत आहे. काका पुतण्याच्या या लढाईमध्ये एका बाजूला सुप्रिया सुळे तर दुसरीकडे सुनिता पवार या उमेदवारा असणार आहेत. यामध्ये आता शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणास बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा केला आहे.
“आज पहाटे चार वाजता मला छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टांत झाला. बारामती लोकसभा मतदारसंघातून एक सुसंस्कृत सुशिक्षित चेहरा महाराष्ट्राला मिळावा आणि स्वराज्याचे काम पुढे जावं, अशा प्रकारचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांना दिला” असा दावा इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी केला आहे. तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे स्वराज्यातील महत्त्वाचे किल्ले या मतदारसंघात येतात त्यांचा जीर्णोद्धार आणि समाजाचा विकास व्हावा, म्हणून हा आदेश मी मानतो. 3 एप्रिल ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील पुढील माहिती देणार असल्याचं ते म्हणाले.
‘अनेक वर्ष या भागातील लोक परिवर्तनाच्या उपेक्षित असून यामुळेच अशीच छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊंची मी लढावे ही इच्छा असावी. स्वराज्याच्या निर्मितीचा मूळ गाभा या सर्व प्रदेशात आहे. हाच प्रदेश आज वंचित उपेक्षित आणि मागास असून या मतदारसंघातील अनेक मावळ्यांना मुंबई पुण्यामध्ये हॉटेलमध्ये वेटर, वॉचमन आणि रीक्षा चालवावी लागते, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हे चित्र बदलण्यासाठी मला हे संकेत दिले असावेत असे मी मानतो. त्यामुळे बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणार आहे’, असं नामदेवराव जाधव यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी दाखवला जिवंत खेकडा
-पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस
-Shirur Lok Sabha | ‘वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही’; आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना धरलं धारेवर