पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर व्याख्याते नामदेव जाधव हे सातत्याने टीका करत आहेत. यावरुन शरद पवार गटाचे पुण्यातील कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. या सर्व प्रकारानंतर आता नामदेव जाधव यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘शरद पवार यांनी ५० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात सतत मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळू शकले नाही. समाजात कायम तेढ निर्माण करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ मार्चला बारामती येथील शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे’ अशी आक्रमक भूमिका नामदेव जाधव यांनी घेतली आहे.
‘शरद पवार हे ४ वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी मराठा समजाच्या आरक्षणाबाबत का निर्णय घेण्यात आला नाही. आजवर सत्तेच्या बाहेर ज्या ज्या वेळी शरद पवार गेले आहेत. त्यावेळी मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आहे, त्यामागे शरद पवार असून मनोज जरांगे पाटील हे त्यांचीच भाषा वापरत आहेत’ असा गंभीर आरोप नामदेव जाधव यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”
-ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित
-धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे
-Pune Drugs Racket: ड्रग्ज मालिका काही संपेना; कोंढव्यात सापडले २ किलो ड्रग्ज
-पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक