पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजावर टीका केली होती. त्याला आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर देताना असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर सडकूट टीका केली आहे. ओवैसींच्या या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.
मुस्लीम लोक जास्त मुलांना जन्म देतात असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ तर अमित शहा यांना सहा बहिणी आहेत. तसेच राष्ट्रीय संव्यसेवक संघाच्या प्रमुख्यांना १० ते १२ बहिण भाऊ आहेत. मुस्लीम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता आहे, असे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत असल्याचं असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं आहे.
‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. हे सांगताना मला कसलाही संकोच वाटत नाही. समाजामध्ये मोदी हे द्वेष पसवण्याचे काम करत आहेत. द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम लोक सर्वात जास्त मुलं जन्माला घातल असल्याची भीती पसरवली जात आहे’, असं ओवैसी म्हणाले आहेत. तसेच केंद्र सरकराच्या आकडेवारीनुसार मुस्लीम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. तरीही मोदींनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्च रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ‘भटका आत्मा’ म्हणून केला उल्लेख
-“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
-पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं
-पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच पुणे मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप