पुणे : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असून जगभरातून मोठ्या संख्येने भाविक कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर होत असलेल्या या महाकुंभ मेळ्यामध्ये सामिल होण्यासाठी भाविकांची घडपड सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरामध्ये आता विमान कंपन्यांनी अचानक दरवाढ केली आहे. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी पहायला मिळाली. अशातच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“प्रस्थानाची तारीख जवळ येते,तशी डायनॅमिक भाडेप्रणाली आपोआप भाडे वाढवते. मात्र,ही भाडेवाढ किमान आणि कमाल दराच्या आत आहे. सर्व शेड्युल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स त्यांच्या वेबसाइट्स अद्ययावत करत असतात. त्यात नवीन भाडे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी ऑफर केले जाते,त्याची प्रत DGCA कडे पाठवली जात आहे”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या विमानभाडे सर्व क्षेत्रांतील टॅरिफ मॉनिटरिंग शीटनुसार किमान आणि कमाल मर्यादेत आहे. याबाबतचे सक्षम अधिकारी दैनंदिन निरीक्षण करत आहेत, असं मोहोळ यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी प्रयागराजकडे उड्डाण घेणार्या विमानांच्या वाढलेल्या तिकीटदरावर भाष्य करत तिकीटदरात विमान कंपन्यांनी केलेल्या प्रचंड दरवाढीचं मोहोळ यांनी समर्थन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप
-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…
-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट