पुणे : तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच चौथ्या टप्प्यातील मतदान देखील येत्या १३ तारखेला होणार आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील काही भागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा विधानसभा मतदारसंघातील कसबा गणपती मंदिर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत वारसा वास्तूंच्या (अ गट) 100 मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर मार्ग काढू अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली आहे.
पुरातन वास्तूच्या परिसरातील नवीन बांधकामांना तसेच जुन्या बांधकामाच्या पुनर्विकासाला असेलेल्या मर्यादा किंबहुना बंदी यामुळे गेली कित्यक दशके एकापाठोपाठ एक जुने वाडे जमीनदोस्त होत चालले आहेत. पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शिवकालीन तसेच पेशवेकालीन पुण्याची ओळख असलेल्या या वाड्यांचा पुनर्विकास आवश्यक असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
“या वाड्यांमध्ये राहाणारे बहुसंख्य मूळ मालक आधीच वाडे सोडून अन्यत्र स्थायिक झाले आहेत. जुने भाडेकरू जीव मुठीत धरून राहत आहेत. जाचक आणि अत्यंत त्रासदायक अशा नियमांचे ओझे मागील काही दशकांपासून या परिसरातील नागरिकांना वाहावे लागत आहे. प्रसंगी नागरिकांना गंभीर आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. देशातील सुमारे साडेतीनशे ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील लाखो बांधकामांचा हा प्रश्न आहे. पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून नियम शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे”, असे आश्वासनही यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार
-“त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचाय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
-‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…
-सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…