पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार केंद्रीय राज्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाले आहेत. मुरलीधर मोहोळ हे पुण्यात येताच पुणे विमानतळावर पुणे शहर भाजपकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे विमानतळ ते पुणे भाजप कार्यालयापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात येत आहे. भाजप कार्यालयात मोहोळ यांचे स्वागत केले जाणार आहे. पुणे विमानतळावर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
पुणे विमानतळावर… pic.twitter.com/VP0LPMF4Sp
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 15, 2024
‘पक्षाचा, पक्षाच्या नतृत्वाला मनापासून धन्यावाद. या सर्वांचा मला अभिमान आहे. याच विमानतळावर समोरच्या गर्दीत स्वागताला उभा असणाऱ्या कार्यकर्त्याचे स्वागत करण्यासाठी आज सर्वजण आले. याचा मला आनंद आहे. आणि हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला वरिष्ठांनी संधी दिली. बुथवर काम करणारा कार्यकर्ता आता देशाच्या मंत्रिमंडळात काम करणार आहे. हा प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, पुणेकरांचा सन्मान आहे. पुणेकरांनी मला निवडून दिले अन् काम करण्याची संधी दिली, त्यामुळे पुण्यात पुन्हा घरी येताना सर्व नेते, सहकारी उपस्थित आहेत, मनापासून आनंद होत आहे. नवीन जबाबदारी आहे याचे भान मला या सर्वातून १०० टक्के जाणवते’, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
पुणेकरांनो, तुमच्यासाठी शब्दही अपुरे पडतील !
आजवर कित्येकदा पुणे विमानतळावरून दिल्लीला गेलो असेल. कितीदा तरी याच विमानतळावर उतरून घरीही गेलो असेल. आजचा दिवस मात्र भारावून टाकणारा होता. सकाळीच दिल्लीला विमानात बसलो, तेव्हाच मनात असंख्य वेगळ्या भावना दाटून आल्या.
पुणेकरांच्या… pic.twitter.com/IFYsSamh0q
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 15, 2024
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण विमानतळाचे अनेक प्रश्न घेऊन दिल्लीला गेलो होतो. या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या, अनेक संदर्भ होते. दिल्लीतील पत्रकारांनी देखील हाच प्रश्न विचारला दोन-तीन वर्षांपूर्वी तुम्ही याच कामासंदर्भात महापौर म्हणून दिल्लीला आला होतात आणि आता काही सूत्रे तुमच्या हातात आली. त्यामुळे निश्चितच हा मोठा आनंद आहे. देशाची सेवा करण्याची संधी आता नरेंद्र मोदी मोदी आणि आमच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहे”, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जानाई-शिरसाई योजनेची बंदीस्त पाईपलाईन होणार; अजित पवारांनी किती कोटींचा दिला निधी?
-पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय
-पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
-Sushant Singh Rajput : सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक, खास दिवशी शेअर केला फोटो…
-Pune Hit & Run: न्यायालयातून महत्त्वाची अपडेट आली समोर, आज नेमकं काय घडलं?