पुणे : पुणे लोकसभेची जागा ही महायुतीमध्ये भाजपकडे आहे. भाजपने काल बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुणे लोकसभेसाठी माजी महापौर आणि सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरवात केली आणि ग्रामदेवतांच्या दर्शनाने करत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे. अनेक प्रकल्प आणि योजना पुणे शहरात सुरु केल्या आहेत. आता पुणेकर सुद्य आहेत ते विकासाला प्राधान्य देतील. सगळे पुणेकर आमच्या सोबत आहेत. १०० टक्के आमची एकी शेवटपर्यंत राहणार आहे”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
वंदन लोकनेत्यास…
पुण्यनगरीचे लोकनेते आणि लोकप्रिय खासदार स्व. गिरिशभाऊ बापट यांच्या कसब्यातील जनसंपर्क कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. स्व. गिरीशभाऊंचा संपूर्ण राजकीय प्रवास आणि सामाजिक जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अखंड प्रेरणा देणारी आहे.… pic.twitter.com/BfscxEvQpX
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) March 14, 2024
मुरलीधर मोहोळ यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आहे. पुणे शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते. भाजपच्या बैठकीत निवडणुकीत कामाला लागण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. मोहोळ यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी जनतेपर्यंत जाण्याच्या’ सूचना दिल्या आहेत.
महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने पक्ष संघटनेत महत्त्वाच्या असणारे सरचिटणीस पद मोहोळ यांना देत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांमध्ये अनेक प्रबळ दावेदार असताना मोहोळ यांना संधी देत भाजपने निवडणुकीच्या मैदानात पहिला यशस्वी डाव खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘..तर आमदाराकी सोडावी लागेल’; अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा
-‘बारामतीचा विकास माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही’; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
-भाजपकडून मोहोळांना उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
-भाजपने तर डाव टाकला आता काँग्रेस काय खेळी खेळणार; मोहोळांना टक्कर देण्यासाठी कोणाला देणार उमेदवारी?