पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुणे शहरात रेस कोर्स मैदानावर महायुतीच्या पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारने पुण्यासाठी दिलेल्या गोष्टींबाबत भाष्य केले आहे.
केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्रातून चांगली मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांची धोरणं ऐकून घेण्यासाठी पुणेकर कमालीचे उत्सुक आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
“पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील १० वर्षात भरपूर काही दिलं. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरंच काही देणार, असा विश्वास आहे. आज मोदींची पुण्यात सभा आहे ही पुणेकरांनी चांगली बाब आहे. पुणेकरांना मोदींना बघायला मिळणार आहे शिवाय त्यांना ऐकायलादेखील मिळणार आहे. या सगळ्यासाठी पुणेकर उत्सुक आहे. आतापर्यंतच्या सभेतली सगळ्यात चांगली आणि मोठी सभा आजची होणार”, असं दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार
-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित