पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे भाजपमधील बड्या नेत्यांमध्ये पुण्याचा कारभारी होण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पहायलाम मिळालं होतं. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेत विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हजर होते मात्र, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मात्र गैरहजर होत्या. त्यांनी स्वतंत्र आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये पुण्याचा कारभारी होण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.
गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुणे भाजपचे नेतृत्व खासदार मुरलीधर मोहोळ करणार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील करणार की राज्यमंत्री माधुरी मिसाळ करणार, यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिली आहे.
भाजपमध्ये कोणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही. त्यामुळे पुण्यात सामूहिक नेतृत्व केलं जातंय. अगदी राज्यात अन् देशातही तसंच आहे. असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत सामूहिक नेतृत्व असेल असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकरांशी बोलताना पुण्याचा कारभारी कोण या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या योजनांमुळे देशातील किमान पन्नास टक्के लाभार्थी झालेत. आज ही ६५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यानिमित्ताने अधिकृत मालमत्ता पत्रक या सर्वांना मिळाले आहे. त्यामुळे प्रॉपर्टी धारकांना यावर आता कोणत्याही बँकेचे कर्ज उपलब्ध होणार असून स्वामित्व योजनेची ही मोठी उपलब्धी आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवड पाणी प्रश्न पोहचला थेट न्यायालयात; नेमका काय प्रकार?
-पुणेकरांसाठी क्रेडाईचे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शन; गृहनिर्माण प्रकल्पांना चालना
-दहावी-बारावी बोर्ड: हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण
-दिल्लीतून आणलेल्या बनावट नोटांची पुण्यात वटवणी; पोलिसांनी केला पर्दाफाश
-राज्यात सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाचा निर्णय; शालेय शिक्षणंत्र्यांनी केली घोषणा