पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे निवडणूक लढत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. मोहोळ कुटुंबीयांवर १४ कोटी ८५ लाख ५७ हजार ८७७ रुपयांचे कर्ज आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्जा सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे पाच कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता १९ कोटी पाच लाख ६७ हजार ६९५ रुपये अशी एकूण २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची मालमत्ता आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्यावर १४ कोटी ५८ लाख ६९ हजार ९७७ रुपये, तर पत्नीवर एक कोटी २६ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा, कासार आंबोली आणि भूगाव, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येरूली येथे शेतजमीन आहे. पत्नीकडे मुळशी तालुक्यातील दासवे येथे शेतजमीन आहे.
कोथरूड येथे एक ५ हजार २४५ चौरस फुटाचा बंगला असून त्याची किंमत ५ कोटी ४७ लाख ८१ हजार ११४ इतकी आहे. तर ४५० चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत ३४ लाख ४० हजार इतकी आहे. मोहोळ यांच्या कुटुंबाकडे ४१ तोळे सोन्याचे दागिने आहेत. तर मोहोळ यांच्याकडे २२ लाख १४ हजार ३८२ रुपयांचे एकच वाहन आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजितदादा म्हणजे विकास कामे करणारे नेते‘; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आठवलेंचा झंझावाती दौरा
-‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका
-पुणे मेट्रो धावतेय सुसाट! प्रवासी, उत्पन्न वाढले, पण प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी तक्रार
-‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य