पुणे : पुणेकरांकडून महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या मिळकत करामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करम्यात आला आहे. महापालिकेत प्रशासक असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय न घेण्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे यंदाही कोणत्याही प्रकारची करवाढ होणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार मिळकत करात वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य झाला आहे.
लोकप्रतिनिधी महापालिकेच्या कारभारात नाहीत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने यंदा करवाढ टाळली असल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे. महापालिकेने मिळकत कर वाढ प्रस्तावित केली नसली, तरी मिळकत करात दिल्या जात असलेल्या सर्व सवलती यंदाही कायम राहणार आहेत. महापालिकेने मिळकतकरात वाढ केली नसली, तरी उत्पन्नवाढीसाठी थकीत मिळकतकराची वसुली, नवीन मिळकतींची करआकारणी तसेच थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींची लिलाव करून महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिकेच्या वतीने सध्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले हे विविध विभागांच्या बैठका घेऊन आढावा घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: ‘जीबीएस’मुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर
-‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?
-मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं
-‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम
-‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द