पुणे : पुणे महापालिका प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पालिका कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून रोजच्या कामाच्या तासांमध्ये वाढ करुन करुन शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. मात्र, त्यानंतरही विभागप्रमुखच वेळेचे पालन करत नसल्याचे कर्मचारी देखील वेळ पाळताना दिसत नाहीत.
कर्मचाऱ्यांच्या या वागण्याची दखल घेत वेळ न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सज्जड दम दिला आहे. ‘कामाची वेळ पाळा, अन्यथा थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल’, असा फतवा आयुक्त डॉ. भोसले यांनी काढला आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसून शुक्रवारपासूनच गायब असतात. त्यामुळे नागरिकांनी कामे होत नाहीत. परिणामी त्यांना पालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात.
कामाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. मात्र कर्मचारी, अधिकारी वेळ पाळत नसल्याचे समोर आले आहे. सायंकाळी साडेपाच वाजताच कार्यालयातून बाहेर आवारात किंवा इतर परिसरात गप्पा मारतात.
दुपारी जेवणाची वेळ २ ते अडीच अशी असताना दीड वाजता टोळक्याने जेवणासाठी हॉटेलमध्ये टाईमपास करत बसतात. त्यामुळे कर्मचारी २ वाजण्याच्या आधीच दरवाजे बंद करतात. दुपारचे काम हे अडीच वाजता सुरु व्हायला हवे मात्र, ३ वाजता कामकाजाला सुरुवात होते. काही अधिकारी साडेतीन नंतर कार्यालयात येऊन पुन्हा साडेपाच वाजता कार्यालयातून घरी जातात. कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीचा, कामचुकार पणाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिक थेट आयुक्तांकडे तक्रार घेऊन जातात. त्यानंतर आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या; महाबळेश्वरमधील ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलवर चालवला जेसीबी
-अजित पवार गटाचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ‘आम्ही तुमच्यासोबत’
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…