पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या शहरीकरण यामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातच पुणे शहरात सर्वात मोठी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. शहरातील कात्रज-कोंढवा भागातील वाहतुकीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरून जाताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून या त्रासातून मुक्तता होण्यासाठी महानगरपालिकेकडून आता पावले उचलली जात आहेत. शासनाकडून महापालिकेला १४० कोटींचे अनुदान मिळालेले असूनही ही कात्रज चौकातील पूलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने आयुक्तांनी यात लक्ष घालून बैठक घेऊन प्रशासनाला तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.
कात्रज-कोंढवा भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज चौकात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे कात्रज चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कात्रज चौकात सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र, तरी या चौकात असलेली महत्वाची एक जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. ही जागा पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जागा मालकांची संमती नसल्याने या पूलाचे काम संथ गतीने सुरु होते. परिणामी वाहतूक कोंडींची समस्या वाढत चालली होती. त्यातच आता ही प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पथ आणि भूसंपादन विभागाला दिले आहेत.
कात्रज चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी आवश्यक असलेली जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर येथील जागा मालकांसह या पुलाच्या कामात कोंढव्याच्या दिशेच्या रॅम्पच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी सात जागांच्या मालकांची बैठक महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी घेतली. यावेळी हमीपत्र देण्याच्या अटीवर या जागा आगावू ताब्यात देण्यास जागा मालकांनी सहमती दर्शविली असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! बिर्याणी बनली मित्राच्या खूनाचं कारण; नेमका काय प्रकार?
-मंत्रिमंडळ विस्तार होताच पुण्यातील ‘त्या’ स्मारकाबाबत मोठा निर्णय; संरक्षित स्मारकाचा दर्जा देणार
-‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी
-पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद
-शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द