पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बीड, परभणीनंतर आज पुणे आणि मुंबईमध्ये जनाआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाकडून तसेच सर्व स्तरातून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पुण्यात लालमहलपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जनआक्रोश मोर्चा निघत आहे. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निषाणा साधला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
तुमच्यातली माणुसकी जिवंत असायला हवी, ते आरोपींना घेऊन पळत आहेत. ते त्यांना सांभाळत आहेत. किती दिवस असे संदेश राज्याला दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत चार दिवसात एकही ओबीसीचा नेता या प्रकरणावर बोलत नव्हता, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासोबत दुःखात सहभागी होते आणि अचानकच गेल्या चार दिवसापासून बोलायला लागले. धनंजय मुंडे शहाणे व्हा, अन्यथा समाज आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली त्यांच्यावर असा हल्ला करू नका. मराठ्यांवरच असे पलटण्याचा प्रयत्न करू नका’, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आतापर्यंत समाजाने मोडलेला नाही. आम्ही फक्त त्यांच्या शब्दासाठी शांत आहोत. पण या गुन्ह्यातून एक जरी आरोपी सुटला, तर मराठ्यांना मुख्यमंत्र्यांनी धोका दिला असा संदेश समाजात जाईल. यामुळे मुख्यमंत्री साहेब आता आवरा, मुंडे यांच्या मागे न राहता आपण राज्यातील जनता आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सिद्ध करा, असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा
-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले
-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती
-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा