पुणे : पुणे शहरात अलिकडे चोरी, खून, बलात्कार असे अनेक गुन्हे घडण्याचे प्रकार वाढत आहेत. अशातच चोरटे कशाची चोरी करतील सांगता येत नाही. गेल्या काही महिन्यात पुणे शहरामध्ये मिठाईच्या दुकानात चोरी झाली होती. तेव्हा चोरांनी मिठाई चोरी केली होती. त्यानंतर आता मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चोरट्यांनी चक्क बिर्याणी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. चोरट्यांटा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
जोराची भूक लागलेल्या चोर हॉटेल बिर्याणी खाण्यासाठी तिघेजण तोंडाला मास्क लावून हॉटेलच्या किचनमध्ये घुसले. संपूर्ण किचनची उलथापालथ केली. पण बिर्याणी चोरांना बिर्याणीचा एकही घास मिळाला नाही. शेवटी चोरांनी शेवटी हॉटेलमधले चिकन लॉलीपॉप आणि ३० रुपयांची चिल्लर चोरली कोल्ड्रिंक पिलं आणि हॉटेलमधून पळ काढला. चोरांचा किचनमधला संपूर्ण धुमाकूळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
संबंधित हॉटेल मालकांनी या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्याक घेतले असून या चोरांचा शोध सुरु आहे. हॉटेल मालकाचे अर्थिक नुकसान झाले असून चोरांच्या या कृत्याची चर्चा रंगली आहे. मुळशी परिसरातील या प्रसिद्ध हॉटेलमध्ये झालेल्या घटनेवरुन आता हॉटेलमधील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?
-‘महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साप करणार’; शंकर जगताप यांचा विश्वास
-पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या निकटवर्तीयाचं मोठं वक्तव्य