पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू केली असून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजने’साठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. नारीशक्ती दूत अॅपवरुन, पोर्टलवरुन, सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभागातही महिलांकडून या योजनेसाठी अर्जांची पूर्तता केली जात आहे.
लाभार्थी महिलांची माहिती मिळवणे आणि तिची खात्री करणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेली जुन्या योजनांबाबतची लाभार्थी महिलांची माहितीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते.
राज्य सरकारची ही महत्त्वांकांक्षी योजना राबवण्यासंबंधी विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली आहे. ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा यांसारख्या विभागांकडे जुन्या योजनांसाठी संकलित केलेली लाभार्थी महिलांची माहिती महिला आणि बालविकास विभागाला द्यावी, असे ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा विभागांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. महिला आणि बालविकास विभागाला विविध विभागांनी दिलेली माहिती, लाभार्थी महिलांची बँक खाती आणि अन्य तपशील संकलित करून तो माहिती तंत्रज्ञान विभागाला दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?
-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?