पुणे : राज्यात महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहिण योजनेसंदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसाहाय्य केले जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी-चिंचवड शहरातून माेठा प्रतिसाद मिळाला आहे. ४ लाख ३२ हजार ८९० महिलांनी अर्ज भरला. त्यांपैकी ३ लाख ८९ हजार ९२० महिला लाडक्या ठरल्या आहेत. त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. तर, ४२ हजार ४८६ महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक ६५ हजार ८७१ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ, भोसरी येथील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात ६३ हजार १०६ आणि थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात ६० हजार ३३ महिलांचे अर्ज योग्य ठरले आहेत.
निगडीमधील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक १० हजार ८२९ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ७ हजार ६२ अर्ज बाद झाले आहेत. आवश्यक कागदपत्रे नसणे, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे, अशा काही कारणांनी हे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच आणखी नव्याने अर्ज केलेल्या ५० हजार महिला या आता लाडकी बहिण होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे हटवा’ शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी, ‘तो’ नेता कोण?
-विजयानंतर हेमंत रासनेंनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आभार; ९० हजार नागरिकांना वाटले पेढे
-पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात पाणीबाणी, कोणत्या भागात कपात?
-भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?
-मावळच्या तरुणांकडून महायुती सरकारला विशेष शुभेच्छा; आकाशात झळकवले बॅनर