पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मुलांमध्ये अजय कळसकर तर मुलींमध्ये मयुरी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षेचा हा निकाल असून आयोगाच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेचा हा निकाल असून आयोगाच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. खेळाडू प्रवर्गातील निकाल वगळून हा निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २०२१ मधील या परिक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. ६ जुलै आणि १७ जुलै २०२२ रोजी ही परिक्षा घेतली होती. त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची अनेकजण प्रतिक्षा होती.
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.https://t.co/hk0iGspIKGhttps://t.co/nnn7N1bZpb
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2024
नुकत्याच झालेल्या परिक्षेत ३५८ जागांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये अजय कळसकर यांना ३२९.५० टक्के गुण मिळाले आहेत. या निकालासह प्रत्येक प्रवर्गसाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराची गुण देखील आयोगाने त्यांच्या संकेतस्थळात प्रसिद्ध केले आहेत. अर्थात काही उमेदवारांसंदर्भात तक्रारी आल्याने पुनर्पडताळी करण्याच्या अटीच्या अधीन राहून या खेळाडू उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….
-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?
-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?