मुंबई | पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं वक्तव्य केले आहे. अमोल कोल्हे हे बुधवारी मंचरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु आहे’, अमोल कोल्हे यांनी केले आहे. मुंबईत मराठा आरक्षण संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावरही अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.
‘सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा. मागेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे यामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे समजणे गरजचे असून सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल, असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे आहे’, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
‘विरोधकांना राज्यात अशांतता राहावी, असे वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे’, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!
-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?
-महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला
-Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला; आणखी २ गर्भवती महिलांना संसर्ग