पुणे : राज्यात महिला सुरक्षेसाठी अनेक मोठी पाऊले उचचली जात आहेत. मात्र तरीही राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चाललेली पहायला मिळत आहेत. नुकतेच झालेले बदलापूरमधील आणि कोलकातामधील प्रकरण ताजे असून पुणे शहरामध्ये देखील महिलांचा विनयभंग, छेडछाड, बलात्कार अशा घटना घडल्या आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड भागातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील एका १४ वर्षीय मुलीसोबत तिच्या आईच्या प्रियकरानेच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंकज बाबुराव धोत्रे (वय, ४५, राहणार हांडेवाडी, हडपसर) असे त्या नराधमाचे नाव असून हा त्या मुलीच्या आईचा प्रियकर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आरोपी धोत्रे हा पीडितेच्या घरीच होता. पीडितेची आई कामावर आणि भाऊ शाळेत गेला तितक्यात या नराधमाने डाव साधला. मुलगी घरात एकटी पाहून त्याने तिला जवळ घेत अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. तोच ती मोठ्याने ओरडू लागली आणि त्याने तिला सोडून दिले.
घडला प्रकार मुलीने आईला सांगितले. मात्र तिने दुर्लक्ष केल्याने तिने शाळेतील शिक्षिकेला सांगितले. मुलीच्या शिक्षिकेने शाळेत पोलिसांना बोलवले. त्यानंतर रावेत पोलिसांत पॉक्सो अंतर्गत धोत्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम पंकज धोत्रेला बेड्याही ठोकण्यात आल्यात. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा
-काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य
-मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन
-अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?