पुणे : एखादं स्वप्न पाहणं, फुलवणं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धरपडणं, या सर्वामुळे माणसाच्या जीवनाला अर्थ येतो. आपल्या नशिबात जे काही लिहलं तेच घडतंच. येईल त्या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी आपण नेहमी सज्ज असलं पाहिजे. कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतातच.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शामल भगत या तरूणीचा लढा असाच काहीसा थक्क करणारा आहे. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ नाकारत तिने बंडखोरी केली आणि आता ती थेट आयएएस झाली आहे. नुकताच यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या २४ व्या वर्षी शामल भगत हिने देशात २५८ वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
शामल भगत ही तरूणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची. वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शेजारच्या निरनिमगावात माध्यमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच हुशार असलेली शामल दहावीत शाळेत पहिली आली. शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर काही सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावलं होतं.
शामलला पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आलं नाही. मग दुसऱ्यावेळी प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर काम केलं आणि दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीच्या तारखा समोर असताना शामलच्या आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्यावर सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय. त्यामुळे शामल या दुःखातूनही सावरली आणि मुलाखतीला गेली.
महत्वाच्या बातम्या-
-हॉट फोटोशूट: प्राजक्ता माळीने शेअर केले दिलखेचक फोटोज; चाहत्यांनी पाडला लाईक्स, कमेंटचा पाऊस
-“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले
-‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा