पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावली होती. मात्र गेल्या ४ दिवसांपासून मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यास वेळ लागेल. मॉन्सून २ दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे.
पण गेल्या ४ दिवसांपासून पाऊस थांबला आहे, यामुळे आता नागरिक चिंतेत आहेत. अशातच हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे, थोड्या दिवसात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने सिधुदुर्ग रायगड या घाट विभागात पाऊससह वादळ वाऱ्याचा इशारा दिला आहे.
खरं तर अरबी समुद्रावरून मान्सूनचा प्रवास वेगाने झाला होता केरळमध्ये देखील २ दिवसांपासून पाऊसाने हाजरी लावली आहे. त्यांनतर मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये जोरदार पाऊस पडला, गेल्या चार दिवसांपासून जरी पाऊसाने विश्राम घेतला असाल तरी लवकरच पुन्हा पाऊसाचे आगमन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल
-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला