पुणे : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर हवेत काहीसा गारवा जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यात काही दिवसांत पुन्हा तापमानाचा पारा वाढला होता. आता मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारतात एकत्र हजेरी लावली आहे. हवामान विभागाने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
सध्या राज्यात मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण असून, येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी २६ मे पासून मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नव्हती. आता मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत.
येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. २४ तासांत केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदिवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?
-पुणे पोलिसांकडून कॅफेवर छापा; धक्कादायक वास्तव आलं समोर, अंधारात…
-‘थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स करणाऱ्याला समज द्या’; अंजली दमानिया कोणामुळे संतापल्या?
-‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य
-पुणे हिट अँड रन: “या प्रकरणात आमदाराचा मुलगा, २ उपमुख्यमंत्री…”; नाना पटोलेंने केले धडाधड आरोप