पुणे : डॉक्टरांना दुसरा देव माणलं जातं. कारण मरणाच्या दारात असलेल्या एखाद्या रुग्णाला केवळ डॉक्टरच वाचवू शकतात. रुग्णांची सेवा हाच डॉक्टरांचा प्रथम धर्म आहे. मात्र काही डॉक्टरांना रुग्णाच्या जिवापेक्षा पैसा किती प्यारा आहे हे पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पहायला मिळालं आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. एका महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यावर तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुगाचे नातेवाईक हातात असलेले अडीच लाख रुपये भरण्यास तयार असताना देखील महिलेला रुग्णालयात भरती करुन घेतलं नाही.
या रुग्णालयात भरती करुन घेत नाही म्हणून अखेर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. महिलेच्या पोटात २ बाळ असल्यामुळे तिला जास्त त्रास झाला. अखेर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र तिचा यामध्ये मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या कारभारामुळे आज एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला रुग्णाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत, म्हणून दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन देखील केला होता. मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचे ऐकले नाही. परिणामी गर्भवती महिलेने २ गोंडस मुलांना जन्म दिला. महिलेला मात्र जीव गमावला आहे. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय कारवाई करणार? हे पाहणं सर्वांसाठीच महत्वाचं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
✅म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2025
फेब्रुवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे राज्य सरकारकडून याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कोट्यावधींची जमीन १ रुपयाच्या भाडेपट्टयावर देण्यात आली आहे. एकीकडे राज्य सरकार या रुग्णालयावर कोट्यावधींची जमीन १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर देत आहे तर दुसरीकडे रुग्णांकडून लाखोंचे बील आकारणाऱ्या याच रुग्णालयाचा लालचीपणा समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा
-शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा
-‘लाडका दोस्त देशाचा लाडका…’; मुरलीधर मोहोळांचं भाषण ऐकून मित्राने केला कौतुकाचा वर्षाव