पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणीला केली जात आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर हे इच्छुक आहेत तर काँग्रेस, मनसेमध्ये देखील नावांची मोठी यादी आहे. विविध कार्यक्रम, भेटीगाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचारामध्ये चांगलाच जोर धरला आहे.
माध्यमांच्या सर्व्हेत मुरलीधर मोहोळ पुणेकरांची पहिली पसंती
उमेदवारांकडून एका बाजूला प्रचार केला जात असताना पुणेकर जनतेचा कल जाणून घेण्यासाठी काही माध्यमांनी सोशल मीडियाचा वापर करत केलेल्या सर्वेमध्ये माजी महापौर आणि भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. “पुणे लोकसभेसाठी खासदार म्हणून आपली पसंती कोणाला?” असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्सनी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाला पसंती नोंदवली आहे.
कसा होतो सर्व्हे?
आजच्या काळामध्ये वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सोबतीनेच डिजिटल माध्यमांचा देखील मोठा बोलबाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत ही डिजिटल माध्यमे पोहचतात. महाराष्ट्र आणि पुणे शहरात सक्रिय असणाऱ्या अशाच माध्यमांकडून सद्या Social Media Survey फेसबुक, एक्स तसेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून केला जात असल्याने कोणीही सामान्य नागरिक यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकतात. नागरिकांनी नोंदवलेली प्रतिक्रिया पुढेच दिसत असल्याने याला आपण ओपन सर्व्हे देखील म्हणू शकतो. अशाच सर्व्हेमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नावाला पुणेकरांची पहिली पसंती असल्याने त्यांचे नाव आघाडीवर दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं
-‘यंदाच्या निवडणुकीत ४० हजार मतांनी निवडणून येणार’; शहाजी बापू पाटलांचा विश्वास
-बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास