पुणे : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या झाली. या प्रकरणी पत्नी मोहिनी वाघनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. अशातच त्यांची पत्नी मोहिनीचा देखील या हत्या प्रकरणात हात असल्याचे समोर आले आहे.
मोहिनी सतीश वाघचे त्यांच्याच मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असून पती सतीश वाघची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मोहिनी वाघ (वय ४८) तिचा प्रियकर अक्षय जावळकर (वय ३२) हा सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षयसोबत मोहिनीचे अनैतिक संबंध होते. या प्रेम प्रकरणाची सुरुवातीला कोणालाही शंका आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे प्रकरण समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले. अनेक वर्षे हा वाद सुरु होता. त्यानंतर मोहिनीने पतीची हत्या करुन काटा काढल्याची माहिती आहे.
दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची हत्या झाल्यानंतर त्यांची हत्या ही वैयक्तीक वादावरुन किंवा पैशांसाठी झाल्याची शंका होती. मात्र, पोलीस तापसात अनैतिक संबंधातून तसेच पत्नीनेच सुपारी देऊन हत्या केल्याचे समजताच सर्वांनाच धक्का बसला आहे. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सतीश वाघ यांची प्रेम प्रकरणातून हत्या; पत्नी मोहिनीनेच दिली होती सुपारी
-लाडक्या बहिणींना नववर्षाआधीच राज्य सरकारकडून गिफ्ट; सहावा हफ्ता आजपासून होणार जमा
-शिवाजीनगर बस स्टॅन्डचा होणार कायापालट; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
-पुण्याच्या विकासात भर; अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक
-वाघोलीत भरधाव डंपरने घेतला तिघांचा बळी; मद्यधुंद चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं