पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर प्रचाराच्या माध्यमातून गरळ ओकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे २ गटात विभाजन झाले. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी पुरंदर तालुक्यात एका सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. मला एकदा ते म्हणाले की, मला बारामतीला यायचं आहे. मी त्यांना म्हटलं जरुर या. मोदी आले, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि माध्यमांना म्हणाले, मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो. मला माझ्या बोटाची काळजी वाटू लागली.”
दरम्यान, शरद पवारांनी नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भरसभेत चांगलाच हशा पिकला होता. “मध्यंतरी एक व्यक्ती आहेत, सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले या निवडणुकीत तुम्ही आम्हाला विजयी करा. त्यानंतर मोदींना घटनेत बदल करणं सोपं जाईल. मोदींच्या सरकारमधले मंत्री जाहीरपणे सांगत आहेत की घटनेत बदल करण्यासाठी मोदींना निवडून द्या. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार उद्ध्वस्त होण्याचीच चिन्हं जास्त आहेत” असंही शरद पवार यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर
-Lok Sabha Election | ‘बारणेंचा प्रचार करणार नाही’; मावळात महायुतीच्या बैठकीत नाराजीचा सूर!
-Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर