पुणे : देशातील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. बैठका, अनेक विविध कार्यक्रम सुरू आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
त्यातच पुण्यातून भाजपकडून देवेंद्र फडणवीस लढण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर तुम्ही निवडणूक लढविणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रविंद्र धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.
आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची या निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास नक्कीच लढेल आणि जिंकेल देखील. फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे. पण या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीसांनी लढवली किंवा त्यांच्या आणखी कोणत्या वरीष्ठ नेत्यांनी ही निवडणूक लढवली, तरीही ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वास रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
‘मी ३० वर्षापासून राजकीय जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले.त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणूक सर्व सामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे’, असे रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी, रविंद्र धंगेकर आणि मनसेकडून वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’
-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी
-पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री
-शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात