पुणे: दोन दिवसांपूर्वी कल्याणी नगर मध्ये मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बारमधून पार्टी करून घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलाने आलिशान गाडी बेदरकारपणे चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व तरुणीला धडक दिली. यामध्ये जोरदार धडक बसल्याने संगणक अभियंता असणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. संबंधित मुलाला पोलिसांनी अटक केली, मात्र अवघ्या पंधरा तासांमध्ये त्याला जामीन मिळाल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. यामध्ये आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
“एका बिल्डरच्या मुलाने दोन निष्पाप बळी घेतले, त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 151 कलम लागू होत असताना देखील लावण्यात आले नाही. संबंधित मुलाला लाल कार्पेट टाकून पोलिसांनी घरी पाठवले, यामध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झाला असून हे पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी पैसे खाण्यासाठी सोकावले असल्याने गोरगरिबांचा जीव जात आहे” असा गंभीर आरोप यावेळी धंगेकर यांनी केला आहे.
दरम्यान, कोणताही सामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यानंतर पैशांची मागणी केली जाते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी असल्याने पैशां शिवाय काही चालत नाही. गोरगरिबांना रस्त्यावर उभे तर बिल्डरांना खुर्ची दिली जाते, प्रशासनाने संबंधित मुलाच्या बिल्डर वडिलांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होतं, मात्र तसे झाले नाही. संबंधित मुलावर योग्य गुन्हे दाखल करण्यात आले असते तर त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली असती. दोन निष्पाप मुलांचे अपघातात तुकडे पडलेले असताना देखील आरोपीला लाल कार्पेट टाकलं जात, असे गुन्हेगार घरी जात असतील तर तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी देखील यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुढील ४ दिवस पावसाची जोरदार शक्यता; हवामान खात्याने दिले अपडेट…
-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर
-Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…
-आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे