पुणे : पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये मोठा वाद सुरु आहे. एकीकडे राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर, तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद सुरु आहे. अशातच आज माध्यमांशी बोलताना भाजपचे नेते आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महायुतीतच वाद उभा राहिला आहे.
“मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना?”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांचा रोख पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 24, 2024
“चंद्रकांतदादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत”, अशी एक्स पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले, “निवडणूक यादीतून ‘पिपाणी’ हटवा अन्यथा…”
-Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज
-पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक
-‘मी पालकमंत्री होतो तेव्हा…’; चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता अजित पवारांवर साधला निशाणा