पुणे : पुणे शहरामध्ये महामेट्रोचे जाळे दिवसेंदिवस चांगलेच पसरत आहेत. शहरात अनेक मार्गांवर मेट्रो यशस्वीरित्या धावत आहेत. स्वारगेट ते सिव्हील कोर्ट या भुयारी मार्गाने देखील पुणे मेट्रो यशस्वीरित्या धावत असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम सुरु आहे. अशातच स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो या मार्गावर श्री शंकर महाराज समाधी मठ असून शंकर महाराजांच्या समाधी खालून मेट्रो धावणार होती. मात्र आता या ट्रस्ट आणि भक्तांनी हा संकल्पीय भुयारी मार्ग बदलण्याची विनंती केली होती.
महामेट्रो ने शंकर महाराज समाधी ट्रस्ट आणि भक्तांच्या विनंतीस मान देऊन समाधी खालून जाणारा संकल्पीत भुयारी मार्ग बदलला आहे. तसेच शासन निर्णया प्रमाणे मठा जवळील स्टेशनचे नामकरणाचे बाबत कारवाई होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण झाले असून प्रकल्पाचा मार्ग दाट वस्तीतून जाणार असून परिसरातील अस्तित्वात असलेल्या इमारतींना कोणतीही हानी न पोहचवता काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शंकर महाराज समाजी स्थळाला कोणतीही हानी पोहचणार नाही, यासाठी महा मेट्रो कटिबद्ध असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मेट्रोचे हे स्थानक शंकर महाराज समाधी मठाजवळ असल्याने मठात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच पुणे मेट्रो स्थानकाचे नामकरण करणे, नावात बदल करण्याबाबत कार्यपद्धती ठरवण्याबाबत शासन निर्णय करण्यात आलेला असून त्यानुसार पुणे मेट्रो स्थानक नाव बदला बाबतची कारवाई करण्यात येईल, असेही महा मेट्रोकडून सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच’; आशिष शेलारांची टीका
-जास्तीच्या निधीसाठी भाजपच्या आमदारांची जोरदार फिल्डींग! पालिका आयुक्तांकडून कोणाला झुकतं माप?
-जानेवारी महिन्यात पुणेकरांचा सुखकर प्रवास, पीएमपी अपघातांना ब्रेक; नेमका कसा घडतोय बदल?
-आमदारांना हवाय पालिकेचा कोट्यवधींचा निधी; वार्षिक अंदाजपत्रकात सुरु घुसखोरी!
-कपल्सचे चाळे अन् कॅफेच्या नावाखाली सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी खाकी दाखवताच…