पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडीने आतापासूनच जागावाटपाची बोलणी सुरु केली आहे. मागील आठवड्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपाची प्राथमिक बोलणी झाली असल्याचे समजते. या बैठकीनंतर महाविकास आाघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला आता समोर आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये १०० ते १०८ जागांवर निवडणूक लढू शकतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात १३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला लोकसभेमध्ये ९ जागा मिळाल्या आहेत. आता विधानसभेला ९० ते ९५ जागा मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा मिळवल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला ८० ते ८५ जागांवर लढण्याची संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आता काही भागांमध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिकांनी काही जागांवर दावा केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवर जागावाटपाबाबत आणखी चर्चा होणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; आंब्यांच्या पेट्यांमधून विदेशी मद्य जप्त
-शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा
-‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल
-संजय राऊतांनी राणेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा घोडा…’
-आता बारमध्ये बसून दारु पिण्यासाठीही लागणार ‘हे’ सरकारी दस्ताऐवज