पुणे : आज भाजपकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात चर्चेचे नाव म्हणजे कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी या ७० हजारांच्या मताधिक्याने निवडणून आल्या होत्या. त्यानंतरच्या २०१९ च्या विधानसभेसाठी त्यांना डावलून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली गेली. यावरुन मेधा कुलकर्णी प्रचंड नाराज होत्या. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती.
त्यानंतर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांची नाराजी कायम राहिली होती. त्यातच आता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकूण ६ जागांपैकी ३ जागांसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्या यादीप्रमाणे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित माधवराव गोपछडे यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे. पक्षातील सगळ्या गोष्टी माहित असतानाच पक्षाने हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे सगळं छान घडलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता वाटत नाही. एकत्र येऊन खूप चांगलं काम करु शकतो. हे माहित आहे. पुण्याचा विकास, पक्षाचा विस्तार किंवा बाकी जबाबदाऱ्या असतील, त्या मी पार पाडणार आहे, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
राज्यसभेची उमेदवारी हे पक्षनिष्ठेचे फलित आहे. मी एखादं पद पाहिजे, असं कोणाशी कधी बोलले नाही. या संदर्भात मी पक्षश्रेष्ठी आणि माध्यमांशी कधीही चर्चा केली नाही. मला काम करण्याची संधी हवी असल्याचं मी म्हटलं होतं. माझी मुलं लहान असल्यापासून पक्षाचं काम करते आहे. विचलित होताना तुम्ही मला पाहिलं नसेल, त्याचं हे फळ आज मला मिळालं आहे, असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रोहित रावसाहेब नरसिंगे दिग्दर्शित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
-शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला पुर्णविराम; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया
-Big Breaking | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील या ३ नावांवर शिक्कामोर्तब
-राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन???