पुणे : राज्यात सर्व भागात पाऊस चांगलाच मुसळधार बरसत आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असून किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.
मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस मध्य महाराष्ट्रापर्यंत दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने २ आठवड्यांचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून, २५ जुलैपर्यंत देशभरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भ, ईशान्य भारत आणि मोसमी पावसाचे प्रमुख प्रभाव क्षेत्र असलेल्या मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश
-विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय
-१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा