मावळ : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडत आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांना अटक करण्यात आली आहे. बॅलेट युनिट उलट्या लावल्याचा जाब भोसले यांनी विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले हे थेरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. बॅलेट युनिट उलट्या लावल्याचे दिसल्याने भोसले यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून अडविले. त्यानंतर भोसले यांनी मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मतदान केंद्रावर झालेल्या झटापट झाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार देत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भोसले यांनी तत्काळ अटक केली. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात 8 तासात तब्बल 34.07 टक्के मतदान; पुणेकरांची मतदान करण्यासाठी लगबग
-पिंपरी-चिंचवडमध्ये कमी मतदान; मावळ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान झाले?
-निवडणूक प्रशानसनाच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ संतापले; म्हणाले, ‘एवढ्या उन्हात थांबवलं तर..’
-पुण्यात 1 वाजेपर्यंत 26.48 टक्के मतदान; पुणेकरांच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा
-वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले