पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट पडले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्यात पक्षफुटीपासून तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार कर्तत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील शेळके यांच्यात तुफान जुंपल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“रोहित पवारांना स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. पण, अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी गेली २५ वर्ष झालं रक्ताचं पाणी केलं आहे. त्या अजित पवारांवर बोलून रोहित पवारांना मोठं व्हायचं आहे. मुळात अजित पवार यांनीच रोहित पवारांना राजकारणात आणलं आहे. कर्जत-जामखेडला उमेदवारी मिळवून त्यांना आमदार केलं. मतदारसंघाचा विकास केला. शेळके, लंके यांच्या पेक्षा अधिक प्रेम दिलं. पण, रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे. म्हणून अजित पवारांवर ते टीका करतात.
“२०१९ ला ज्या घडामोडी घडल्या. त्या घडत असताना सर्व नेते एकत्र होते. कुठली भूमिका बदलायची?, कुणाला कुठली खाती द्यायची?, महायुतीत गेल्यास आपल्याला काय मिळेल?, या सर्व घडामोडी प्रत्येकाला माहीत आहेत. तरीही केवळ अजित पवारांना व्हिलन केलं जातं आहे. यावर अजित पवारांनी प्रत्यक्षात बोलावं. अजित पवारांना विरोधक व्हिलन, मलिदा गँग म्हणून बोलत आहेत. अजित पवारांनी सांगावं अशी वेळ आली आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडल्यास रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर जनता फिरू देणार नाही”, असंही सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल
-‘५ वर्षापूर्वी माझी चूक झाली’ म्हणत शरद पवारांनी मागितली जाहीर माफी
-‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ म्हणत नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक
-“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार