पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकारणात केव्हा काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समीकरणं दिवसाला बदलत आहेत. मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सेना नेते श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला सुरवातीपासून विरोध करणारे अजित पवारांच्या राष्ट्रावादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी चांगलाच युटर्न घेण्याच्या तयारीत आहेत.
सुरवातीपासून सुनिल शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. ‘मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निवडून येईल’, असा उमेदवार मावळमध्ये आहे असेही सुनिल शेळके म्हणाले होते. मात्र आता शेळकेंनी थेट युटर्न घेतल्याचं दिसत आहे.
“आमचे सर्वेसर्वा अजित पवार आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असं नाही आहे. शिवसेना, भाजप यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे. महायुतीचा मावळमध्ये अधिकृत उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. मात्र जो संभाव्य उमेदवार असेल त्यांचं काम करताना मोदींना पंतप्रधान करायचं आहे, याच हेतूने महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे”, असंही सुनिल शेळके म्हणाले आहेत.
“निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मावळची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामागची गणितं वेगळी होती. मॅजिक फिगरची माहितीदेखील पक्षाला दिली होती. मात्र महायुतीचा निर्णय आम्ही स्वीकारणार आहोत आणि उमेदवाराचा प्रचार करुन त्यांला जिंकून आणणार”, असं म्हणत सुनिल शेळके यांनी आता युटर्न घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!
-Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले
-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा