पुणे : लोकसभा निवडणुकीत प्रचारसभांना जोर आला आहे. महायुतीत आणि महाविकास आघाडीतही मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. शिंदे गटाकडून खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
लोकसभेचा प्रचार करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मावळात केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता गोंविदा,उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह राज्य आणि केंद्रातील मत्र्यांच्या तोफा मावळमध्ये धडाडणार आहेत. ही सभा १० मे रोजी पिंपरी शहरात होणार आहे.
संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची ८ मे रोजी सांगवी येथे सभा घेणार आहे. यावेळी शरद पवार, नाना पटोले हेही उपस्थित राहणार आहेत. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई , सुषमा अंधारे, ठाकरे गटातील नेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभेचे आयोजन केले आहे. शशिकांत शिंदे, चंद्रकांत हंडोरे यांच्याही सभा होणार आहेत. आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’ होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत
-‘आढळराव पाटील फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत’; अमोल कोल्हेंचा आरोप
-“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली, म्हणून…”; अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
-पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली