पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तरीही मराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये काही पक्षांनी आपापला उमेदवार जाहीर केला नाही. राज्यातील मावळ मतदारसंघामध्ये उमेदवारीवरुन महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. या तिढ्यात मावळमधून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची मोठी चर्चा होती. मात्र स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत. त्या जागेवर भाजपने प्रबळ दावा करत बारणेंच्या उमेदवारीला विरोध करताना आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यानंतर आता पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत मावळच्या उमेदवारीचा तिढा वाढतानाच दिसत आहे. महायुतीमधील या तिढ्यामुळे मावळची जागा कोणाच्या पदरी पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
श्रीरंग बारणे मावळ लोकसभेचे सगल दोन वेळा प्रतिनिधित्व करत आहेत. महायुतीमध्ये भाजपसोबत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्यानंतर मावळ जागेबाबत तिढा वाढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
भाजपनेही मावळवर दावा केला आहे. तिन्ही वेळेस युतीमध्ये भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. या वेळी भाजपला संधी मिळावी. उमेदवार कमळाच्या चिन्हावर असावा’, अशी भाजपची मागणी आहे. मावळचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दंड थोपटले असून, त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-Baramati Lok Sabha Election | शिवतारेंचं ठरलं; अजित पवारांच्या ‘या’ कट्टर विरोधकाची घेणार भेट
-मोठी बातमी! “त्यांना अडचण होतेय म्हणून बाहेर पडतोय”; शिवतारे शिवसेना सोडणार?
-“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”