पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उपुमख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पार्थ पवार यांना मोठा पराभव पत्कारावा लागला होता. शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.
ज्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता आता त्याच श्रीरंग बारणे यांचा प्रचार अजित पवार करणार आहेत. गेल्या ५ वर्षात राज्याच्या राजकारणीची समीकरणं वेगाने बदललेली आपण सर्वांनीच पाहिली आहेत. शिवसेना फुटली, सेनेचे २ गट कोणी सत्तेत तर कोणी विरोधक म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसची देखील हीच परिस्थिती पहायला मिळाली.
पार्थ पवार यांचा २०१९च्या लोकसभेचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यावेळी अजित पवारांनी पार्थ पवारांच्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना पाडण्याचीही भूमिका घेतली होती. मात्र आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी अजित पवारांना मैदानात उतरावं लागत आहे. आज (८ एप्रिल) मावळ लोकसभेत महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर
-लोकसभेच्या तोंडावर देशातील डॉक्टरांचा मोठा निर्णय; देशात पहिल्यांदाच होणार दबाव गट
-‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण
-आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित